Kavya Powar
ताप बरा करण्यासाठी आपण अनेकदा क्रोसिन, पॅरासिटामॉल, डोला, सुमो, कॅल्पोल अशा वापरतो.
Paracetamol in Pregnancyपरंतु आपण गर्भधारणेदरम्यान देखील ही औषधे वापरणे सुरू ठेवू शकतो का? हे मुलासाठी धोकादायक ठरेल का? हे माहीत करून घेणे गरजेचे आहे
गरोदरपणात काही स्त्रिया डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेत नाहीत, तर काही अशा आहेत ज्या विचार न करता बिनदिक्कतपणे पॅरासिटामॉलचे सेवन करतात.
संशोधनानुसार, गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉलचे सेवन करू नये कारण यामुळे प्लेसेंटाला त्रास होऊ शकतो
एवढेच नाही तर त्यामुळे गर्भाची मोठी हानी होते. त्याचा थेट परिणाम मुलाच्या विकासावर होतो. आणि त्यामुळे मुलाच्या यकृतालाही नुकसान होऊ शकते.
पॅरासिटामॉलचे सेवन केल्याने मुलांमध्ये प्रजनन आणि मूत्रजननासंबंधी विकारांचा धोका देखील वाढतो. या आजारात मुलांचे मूत्रमार्ग नीट उघडत नाही.
एनसीबीआयच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉलचे सेवन केल्यास गर्भावर गंभीर परिणाम होतात.