Kavya Powar
स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी लोक तासन् तास व्यायाम करतात.
मात्र व्यायामापूर्वी आणि नंतर काय खावे हे अनेकांना माहित नसते
जर तुम्ही सकाळी एक तासापेक्षा कमी वेळ व्यायाम करत असाल तर त्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या.
जर तुमचा व्यायाम मध्यम असेल तर तुम्ही लहान स्नॅक्स घ्यावा. अनेकवेळा शरीरात उर्जेच्या कमतरतेमुळे आपण नीट व्यायाम करू शकत नाही, अशा स्थितीत थोडा स्नॅक्स खाणे फायदेशीर ठरते.
जे कमी कालावधीसाठी व्यायाम करतात त्यांनी अतिशय लहान आहार घ्यावा
जर तुम्ही एक ते दीड तास व्यायाम करत असाल तर त्यानंतर दर तासाला 30 ते 60 ग्रॅम कार्बोहायड्रेट खावे. व्यायाम केल्यानंतर कार्ब्स, प्रोटीन आणि फॅट नक्कीच घ्या.
व्यायामानंतर लगेचच तुम्ही प्रोटीन शेक, अंडी आणि प्रोटीनचे सेवन करू शकता. वर्कआउटच्या 30 मिनिटांच्या आत कार्बोहायड्रेट घेतले पाहिजे.