सीबीआयचे नवे बॉस; आणि त्यांचे कर्नाटक कनेक्शन...

Akshay Nirmale

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात काँग्रेसने बाजी मारल्यानंतर केंद्र सरकारने कर्नाटकच्याच प्रवीण सूद यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण तथा सीबीआयचे नवे डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे.

Praveen Sood | Google Image

प्रवीण सूद हे पुर्वी कर्नाटकचे डीजीपी होते. प्रवीण सूद हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

Praveen Sood | Google Image

सूद हे दोन वर्षे सीबीआय संचालक असतील. मे 2024 मध्ये ते निवृत्त होणार होते, परंतु या नियुक्तीनंतर त्यांचा कार्यकाळ मे 2025 पर्यंत वाढवला आहे.

Praveen Sood | Google Image

पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते यांची कमिटी सीबीआय संचालकांची निवड करत असते. तथापि, सूद यांच्या निवडीला विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी विरोध केला होता, असे समजते.

Praveen Sood | Google Image

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्य़ाशी प्रवीण सूद यांचा 36 चा आकडा आहे.

Praveen Sood | Google Image

डी. के. शिवकुमार यांनी तर एकदा प्रवीण सूद यांना नालायक म्हटले होते. आमजे डीजीपी  हे भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वागतात. ते भाजपवाल्यांना सोडून केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करतात, असे शिवकुमार म्हटले होते.

D. K. Shivkumar | Google Image

निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास सूद यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही शिवकुमार म्हटले होते. त्यामुळे आता कर्नाटकात सीबीआय विरूद्ध शिवकुमार असा संघर्ष होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

D. K. Shivkumar | Google Image
Sobhita Dhulipala | Dainik Gomantak