Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी ज्या सरदारांनी आपल्या प्राणांची बाजी लावली, त्यापैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुजर.
त्यांच्या पराक्रमाने आणि स्वामीनिष्ठेने त्यांनी मराठा साम्राज्याला अनेक महत्त्वाचे विजय मिळवून दिले. त्यांना महाराजांनी 'गुजर' हे बिरुद बहाल केले होते. चला तर मग त्यांच्या शौर्य आणि त्यागाविषयी जाणून घेऊया..
सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे मूळ नाव कुडतोजी गुजर होते. त्यांच्या असीम शौर्यामुळे आणि पराक्रमी नेतृत्वामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना 'प्रतापराव' हे नाव दिले.
शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळात सरसेनापती हे पद निर्माण केले होते. प्रतापराव हे महाराजांचे चौथे सरसेनापती होते. त्यांच्याकडे मराठा सैन्याच्या घोडदळाची आणि पायदळाची मुख्य जबाबदारी होती.
प्रतापराव हे अत्यंत पराक्रमी, धैर्यवान आणि स्वामीनिष्ठ सरदार होते. त्यांनी अनेक लढायांमध्ये मराठा सैन्याचे यशस्वी नेतृत्व केले आणि शत्रूंना धूळ चारली. महाराजांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता.
उमराणीच्या लढाईत आदिलशाही सरदार बहलोल खानाने प्रतापरावांसमोर शरणागती पत्करली. त्यामुळे प्रतापरावांनी त्याला जीवनदान दिले. मात्र अट ठेवली की, यापुढे स्वराज्यावर चालून यायचे नाही.
मात्र प्रतापरावांनी बहलोल खानाला जीवदान दिल्याने शिवाजी महाराज त्यांच्यावर नाराज झाले. 'जोपर्यंत बहलोल खानाचा पराभव करत नाही, तोपर्यंत तोंड दाखवू नका' असा महाराजांनी निरोप पाठवला. ही महाराजांची आज्ञा प्रतापरावांनी आपल्या मनाला लावून घेतली.
महाराजांनी दिलेल्या आज्ञेमुळे व्यथित झालेले प्रतापराव नेसरीच्या लढाईत आपल्या सहा निवडक शिलेदारांसोबत बहलोल खानाशी लढले, परंतु संख्याबळ कमी असल्याने त्यांना वीरमरण आले.
प्रतापरावांनी सहा शिलेदारांसोबत केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामुळे कवी कुसुमाग्रजांनी 'वेडात मराठे वीर दौडले सात' अशी कविता लिहिली, जी त्यांच्या शौर्याचे प्रतीक बनली.