Pramod Yadav
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज गोवा मनोरंजन सोसायटीच्या विरूद्ध दिशेला 'तपोलोक' योग सेतूचे उद्धाटन पार पडले.
या योग सेतूच्या मार्गावर मांडवी किनारी भगवान परशुरामाचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सावंत यांनी परशुरामाच्या पुतळ्याचे उद्धाटन केले असून, हा पुतळा पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरणार आहे.
मांडवीच्या किनारी भगवान परशुरामांचा पुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या पुतळ्याचे 'गोमंतभूमी जनक परशुराम' असे नामकरण करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथे उभारण्यात आलेल्या तपोलोक या योग सेतूचे उद्धाटन करण्यात आल्यानंतर पुतळ्याचे देखील आनावरण करण्यात आले.
एका हातात धनुष्यबाण आणि दुसऱ्या कुऱ्हाड असलेला भगवान पशुरामाचा पुतळा मांडवी किनाऱ्याच्या सौंदर्यात भर घालत आहे.