दैनिक गोमन्तक
जीवनातील समस्या रुद्राक्ष घातल्याने कमी होतात, पण यासाठी आधी रुद्राक्षांचे प्रकार कोणते हे जाणून घ्या.
तीन मुखी रुद्राक्ष हे फक्त ज्यांना न्यूनगंड, चिंता, नैराश्य, भीती, चिंता आणि अशक्तपणा असे समस्या असलेल्यांनी धारण करावे.
14 मुखी रुद्राक्ष हा सर्व रुद्राक्षांमध्ये सर्वात शक्तिशाली रुद्राक्ष मानला जातो.
रुद्राक्ष हे खूप पवित्र असते, त्यामुळे मासिक पाळीच्या वेळी महिलांनी रुद्राक्ष घालू नये असे मानले जाते.
रुद्राक्ष नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे, आंघोळ करतांना रुद्राक्षची माळ घालू नये.
आठ मुखी रुद्राक्ष हे भगवान भैरव देवाचे अतिशय स्वरुप मानले जाते, दीर्घायुष्य आणि सकारात्मक ऊर्जेसाठी याला घातले जाते.
रुद्राक्ष तांबे, चांदी किंवा सोन्याच्या साखळीत घालता येते, पण तार घट्ट बांधू नये यामुळे रुद्राक्ष तूटेल.
तुम्ही घातलेल्या रुद्राक्षाला दुसरा कोणी हात करु शकत नाही, याची काळजी घ्यावी.
रुद्राक्ष नियमित घातलेले असतांना मांसाहार किंवा मद्यपान करु नका.
रुद्राक्ष शुभ दिवशी किंवा सोमवार, गुरुवारी अशा दिवशी धारण करावे.