गोमन्तक डिजिटल टीम
सोमवारी तुर्की आणि सीरियामध्ये भीषण भूकंप झाला.
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे आतापर्यंत 7,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
भूकंपात लाखोंजण बेघर झाले आहेत, अनेकांनी आपल्या प्रियजणांना गमावले आहे.
भूकंपाची भीषणता दाखवणारे अनेक फोटो समोर आले आहेत.
भूकंपनांतर मोठ्या प्रमाणार बचावकार्य सुरू आहे.
हा भूकंप इतका शक्तिशाली होता की त्याने तुर्की हा देश 10 फुट खचला आहे.
भारतासह 70 देशांनी तुर्कस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे.
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी देशातील दहा प्रांतांमध्ये तीन महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली आहे.
सोमवारी पहाटे चार वाजल्यापासून आतापर्यंत तुर्कीमध्ये 550 वेळा पृथ्वी हादरली.