Akshata Chhatre
बटाटा हा आपल्या दैनंदिन आहारात खूप लोकप्रिय आहे, पण तो खाण्याची योग्य पद्धत आणि योग्य खाद्यसंयोजन अनेकांना माहीत नसते.
बटाट्यात स्टार्चचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचे पचन होण्यास वेळ लागतो. चुकीच्या पदार्थांसोबत बटाटा खाल्ल्यास पोटात गॅस, फुगणे, अॅसिडिटी किंवा थकवा जाणवू शकतो.
बटाट्यातील स्टार्च आणि मांसातील प्रथिने एकत्र पचवणे शरीरासाठी जड जाते. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो.
दूध, दही किंवा चीज यांसारख्या पदार्थांसोबत बटाटा खाल्ल्यास अॅसिडिटी आणि गॅस निर्माण होण्याचा धोका वाढतो. हे संयोजन शरीरात उष्णता वाढवते आणि पचन बिघडवते.
जड डाळी किंवा पालेभाज्यांसोबत बटाटा खाल्ल्यास पोटात गॅस, दुखणे आणि फुगणे यांसारखे त्रास होतात.
गोड पदार्थांसोबत बटाटा खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते, ज्यामुळे शरीर सुस्त आणि थकलेले वाटते.
टोमॅटो, सिमला मिरची किंवा वांगी यांसारख्या आम्लयुक्त भाज्यांसोबत बटाटा खाल्ल्यास छातीत जळजळ आणि अपचनाचा त्रास जाणवू शकतो, ज्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो.