Pramod Yadav
मनुष्य अगदी ‘सूज्य’ आणि ‘सुबेज’ आहे असं कोकणीत म्हणतात.
सूज्य आणि सुबेज हे दोन्ही शब्द पोर्तुगीज आहेत. सूज्य म्हणजे घाणेरडा व सुबेज याचा अर्थ जास्त बोलणारा.
जनेल’ म्हणजे खिडकी. हा शब्द पोर्तुगीज आहे हे कोकणी बोलणाऱ्या अनेकांना ते माहीत नाही.
आगपेटीला अजूनही मी ‘फस्क’ म्हणतो जो मूळचा पोर्तुगीज शब्द आहे.
लिव्हर म्हणजे यकृत. पोर्तुगीजमध्ये त्याला ‘फिग्द’ म्हणतात. हा शब्द अजूनही अनेक वयस्क आणि विशेषकरून कॅथलिक लोक गोव्यात वापरतात.
‘गड्डो’ म्हणजे खेळण्याची गोटी. गड्डो हा पोर्तुगीज शब्द आहे.
माल हा देखील पोर्तुगीज शब्द आहे. माल म्हणजे वाईट. कोकणीत ‘माल पडप’(त्रास, वाईट होणे) हा वाक्प्रचार बनला आहे. मेज (टेबल), कदेल (खुर्ची) हे शब्द पोर्तुगीज आहेत.
याशिवाय ‘पिकासांव’, ‘मेल’, ‘पुल्मांव’, ‘पेजाद’ असे विविध शब्द पोर्तुगीज आहेत.