Akshay Nirmale
पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कॉस्टा युरोपीयन युनियन कौन्सिलच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणार आहेत.
युरोपीयन युनियन कौन्सिलच्या अध्यक्षपदासाठी पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. त्यात कॉस्टा हे उमेदवार असू शकतात.
पोर्तुगीज प्रसारमाध्यमांतील अटकळींनुसार पोर्तुगीज सरकारची धुरा सहकाऱ्यांकडे सोपवून ते युरोपीयन युनियनमधील सर्वोच्च पद स्विकारतील.
अलिकडच्या काही महिन्यांत दहाहून अधिक मंत्री आणि राज्य सचिवांनी राजीनामा दिल्याने ते अडचणीत आले होते. कोस्टा यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ 2026 मध्ये संपत आहे.
गेल्याच महिन्यात कॉस्टा यांनी बुडापेस्ट येथील युरोपा लीगच्या अंतिम फेरीत हजेरी लावली होती. युरोपीयन युनियनचे पद स्विकारण्याचा संकेत म्हणून याकडे पाहिले जात आहे.
कोस्टा हे गोवन वंशाचे आहेत. गोव्यातील लेखक ऑरलँडो दा कोस्टा यांचे ते पुत्र आहेत.
कॉस्टा हे 2015 पासून पोर्तुगालचे पंतप्रधान आहेत. कोस्टा हे पंतप्रधान म्हणून तिसर्यांदा सेवा बजावत आहेत.