Rahul sadolikar
बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली मोठ्या वादांमुळे अनेकदा चर्चेत आला आहे. एक प्रसंग असाही आला जेव्हा 'जो जीता वही सिकंदर' फेम अभिनेत्री पूजा बेदीने त्याच्यासोबतच्या अफेअरचा खुलासा केला.
साधारण १९९० सालची गोष्ट आहे. आदित्य पांचोलीने अभिनेत्री जरीना वहाबशी लग्न केले होते पण तो पूजा बेदीच्या प्रेमात पडला होता. त्यामुळे त्यांचे नाते अल्पकाळ टिकले.
या अफेअरचा खुलासा स्वत: पूजा बेदीने एका मुलाखतीत केला होता आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड असलेल्या आदित्य पांचोलीवरही गंभीर आरोप केले होते
आदित्यसोबतच्या ब्रेकअपनंतर पूजा बेदीने 90 च्या दशकातच एक मुलाखत दिली होती. ज्यामध्ये ती म्हणाला, 'काही दिवसांपूर्वी मला माझ्या मोलकरणीच्या मानेवर काही खुणा दिसल्या.
पूजा बेदीने सांगितले होते की, तिची मोलकरीण 14 वर्षांची होती, ती अल्पवयीन होती.
'पण तिने मान खाली घातल्यावर मला विचित्र वाटलं. मी पुन्हा म्हणाले, आदित्य होता का? यानंतर तिच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ती होय म्हणू लागली.
पूजा बेदीच्या या खुलाशामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मोलकरणीसोबत महिनाभर हा प्रकार घडल्याचेही तिने सांगितले होते