Akshata Chhatre
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. शरीर थकलं तरी चालेल, पण चेहरा निस्तेज दिसू नये, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.
म्हणूनच अनेक जण महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात, सलूनमध्ये तासन् तास घालवतात. रसायनांच्या सतत वापरामुळे त्वचा कोरडी, निर्जीव आणि वयस्कर दिसू लागते.
खरंतर आपल्या घरातच काही नैसर्गिक घटक आहेत, जे त्वचेला नैसर्गिक चमक परत देऊ शकतात. त्यातीलच एक आहे डाळिंबाची साल.
डाळिंबाच्या सालींमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ते मुरुमं, टॅनिंग, सुरकुत्या आणि निस्तेजपणा दूर करण्यासाठी खूपच उपयुक्त ठरतात.
डाळिंबाच्या सालींची पावडर गुलाबजलात मिसळून चेहऱ्यावर लावल्याने मुरुमं कमी होतात, आणि विशेषतः सतत मेकअप करणाऱ्यांना किंवा वयात येणाऱ्या मुलींना याचा चांगला फायदा होतो.
यामध्ये असणारे नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला अकाली वृद्धत्वापासून वाचवतात.
डाळिंबाची साल त्वचेमधील कोलेजनचं प्रमाण टिकवते, ज्यामुळे त्वचा घट्ट आणि लवचिक राहते व चेहरा तरुण दिसतो.