Kavya Powar
डाळिंब हे असे फळ आहे जे आरोग्यासोबतच त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.
य़ामुळे तुमची त्वचा सुधारण्यासोबतच त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करू शकतात.
डाळिंबात अँटीऑक्सिडंट्स आढळतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंटचे काम करते
यामुळे सुरकुत्या कमी होऊ शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही सुरकुत्या दूर करायच्या असतील तर डाळिंबाच्या रसाचा आहारात समावेश करू शकता.
यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल आणि तुम्ही तरुण आणि निरोगी दिसाल.
डाळिंबाच्या दाण्यांपासून तुम्ही स्क्रब तयार करू शकता. त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने मृत त्वचा निघून जाते.
त्वचा सुंदर आणि हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही डाळिंबाच्या तेलाचाही वापर करू शकता.