Pramod Yadav
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा आज वाढदिवस आहे.
प्रतिभाताई देशाच्या 12 व्या राष्ट्रपती राहिलेल्या आहेत.
प्रतिभाताई पाटील यांचा जन्म 19 डिसेंबर 134 मध्ये झाला. त्यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
प्रतिभाताई उत्कृष्ट टेबल टेनिसपटू असून त्यांनी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पर्धांमध्ये अनेक बक्षीसे जिंकली आहेत.
1962 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी जळगावमधून विधानसभेची निवडणूक लढवली.
मुक्ताईनगरमधून त्या 1967 ते 1985 पर्यंत चारवेळा निवडून आल्या.
1985 ते 1990 पर्यंत त्या राज्यसभेच्या सदस्या होत्या. तर, 2004 मध्ये त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली.
प्रतिभाताई 25 जुलै 2007 मध्ये राष्ट्रपतीपदी निवडून आल्या. त्यांनी महिला आणि बाल विकासावर अधिक भर दिला होता.