EaS-E ही आहे भारतातील सर्वात लहान, सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

Akshay Nirmale

नॅनो साईज असलेल्या या कारचे नाव आहे EaS-E (ईएएस-ई). या कारमध्ये डिजिटल इंफोटेनमेंट सिस्टम, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एयर कंडीशनिंग, रिमोट कीलेस एंट्री, रिमोट पार्क असिस्ट, क्रूज कंट्रोल, सीट बेल्ट असे फीचर्स आहेत.

EaS-E Electric Car | Dainik Gomantak

ही भारतातील अधिकृतरित्या सर्वात किफायती इलेक्ट्रिक कार आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 4.79 लाख रुपये आहे. तथापि, केवळ पहिल्या 10 हजार ग्राहकांनाच ही कार या किंमतीत मिळेल.

EaS-E Electric Car | Dainik Gomantak

पीएमव्ही कंपनीच्या माहितीनुसार या कंपनीच्या आत्तापर्यंत 6,000 कार बुक झाल्या आहेत. 2,000 रूपये भरून कंपनीच्या वेबसाईटवर या कारचे बुकिंग करता येते.

EaS-E Electric Car | Dainik Gomantak

PMV EaS-E ही देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार आहे. यात दोन ज्येष्ठांसह एक बालक बसू शकतो. या कारची लांबी 2,915 मिमी, रूंदी 1,157 मिमी आणि उंची 1,600 मिमी आहे.

EaS-E Electric Car | Dainik Gomantak

PMV EaS-E तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे. एकदा चार्ज केल्यावर ही कार 120 ते 200 किलोमीटर धावते. ड्रायव्हिंग रेंज ग्राहकाला निवडता येणार आहे. कारची बॅटरी 4 तासात चार्ज होते.

EaS-E Electric Car | Dainik Gomantak

या कारचे टॉप स्पीड 70 किलोमीटर प्रतितास आहे. पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत या कारचे वितरण सुरू होईल, तसेच ग्राहकांना टेस्ट ड्राईव्ह घेता येणार आहे.

EaS-E Electric Car | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा