दुष्काळावरती मात करण्यासाठी ही झाडं जरूर लावा

गोमन्तक डिजिटल टीम

पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जाते, परंतु अनेकदा कोणती झाडे लावावीत या विषयी 

Tree | Dainik Gomantak

सप्तपर्णी

सात पर्णदले म्हणजे सात संयुक्त पाने असलेला वृक्ष म्हणून या वृक्ष्याचे नाव सप्तपर्णी किंवा सातवीन सरळ वाढणारे खोड, लवकर होणारी वाढ आणि फांद्यांची विशिष्ट ठेवण असलेले हे झाड सदाहरित म्हणजेच वर्षभर हिरवेगार राहणारे झाड म्हणून परिचित आहे

Tree | Dainik Gomantak

पिंपळ

पिंपळ हा वृक्ष भोवतालचे वातावरण शुद्ध करतो. याचमुळे याला पवित्र ठरविले असावे. हा कोठेही, कसाही वाढणारा वृक्ष असल्यामुळे तो मोकळ्या जागेत लावणे योग्य असते.

Tree | Dainik Gomantak

कडुलिंब

कडुलिंबाच्या झाडाची सावली(छाया) थंड असते. या कडुलिंब झाडाच्या सावलीतील (छायेतील) घर उन्हाळ्यात थंड राहते.

Tree | Dainik Gomantak

वड

वडाच्या झाडाच्या पारंब्या आणि वडाचं झाड हे कायमच सर्वांना हवंहवंसं वाटणारं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या झाडापासून आपल्याला ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळतो. त्यामुळेच वटपौर्णिमेलादेखील हे झाड पूजलं जातं

Tree | Dainik Gomantak

हिरडा

हिरडा स्वास्थ्यसंवर्धक आणि रोगनाशक आहे. औषधात व आरोग्य वाढविणाऱ्या द्रव्यात याचे स्थान महत्त्वाचे आहे

Tree | Dainik Gomantak

पळस 

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड राहतात. जेवण्याच्या पत्रावळीसाठी याचे पानाचा वापर होतो.या झाडास वसंत ऋतुत (होळीच्या सुमारास) गर्द केशरी रंगाची फुले येतात

Tree | Dainik Gomantak

वरुण

वरुणाचा लहान पानझडी वृक्ष असतो. पाने संयुक्त असून एक आड एक असतात. पर्णिका तीन व पान रुंद शंखाकृती असते. फुले पांढरट मोठी व सुगंधी, 

Tree | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा