Pramod Yadav
बटरफ्लाय बीच
फुलपाखरे, गोल्डफिश आणि खेकड्यांच्या विविध प्रजातींमुळे बटरफ्लाय बीच हा गोव्यातील मस्ट विझिट बीच आहे.
म्हादई वन्यजीव अभयारण्य
म्हादई वन्यजीव अभयारण्य देखील पावसाळ्यात पाहण्यासारखे ठिकाण असून, येथील जैवविविधता नाविण्यपूर्ण आहे.
ओल्ड गोवा चर्च
ओल्ड गोवा येथील बॅसिलिका ऑफ बॉम जिझस हे चर्च जगभरात प्रसिद्ध असून, गोव्यात आल्यानंतर या चर्चला भेट द्यायला हरकत नाही.
आग्वाद किल्ला
गोव्याच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला आग्वाद किल्ला गोव्यातील अनेक घटनांची माहिती उलघडून द्यायला मदत करतो.
शापोरा किल्ला
प्रसिद्ध दिल चाहता है चित्रपटात शापोरा किल्ला दाखवण्यात आला असून, पावसाळ्यातही हा किल्ला तुम्हाला पाहता येईल.
गोव्याचे पुरातत्व संग्रहालय
ओल्ड गोवा येथे असलेले पुरातत्व संग्रहालयात तुम्हाला पाहायलाच हवे, येथे अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती आणि कलाकृती पाहायला मिळतील.
दुधसागर धबधबा
पावसाळ्यात गोव्यात फिरण्याचे सर्वांच्या आवडीचे ठिकाण म्हणजे दुधसागर धबधबा, कर्नाटक गोव्याच्या सीमेवर या धबधब्यात या पावसाळ्यात नक्की भेट द्या.