Pramod Yadav
प्रसिद्ध मिरामार बीचजवळील चौकात असलेला युनिटी पुतळा सर्वात पहिल्यांदा लक्ष वेधून घेतो.
सध्या या पुतळ्याभोवती गोव्यातील G20 बैठकांच्या पार्श्वभूमीवर सजावट करण्यात आली आहे.
चौकातील या सजावटीमध्ये गोव्याची संस्कृती, गोव्याचे ओळख असणारे काजू आणि ग्रामीण पद्धतीची सजावट करण्यात आली आहे.
उभारण्यात आलेल्या कलाकृतींमध्ये गोव्याच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन होते.
मधोमध असलेला युनिटी पुतळा आणि सभोवतालची सजावट अधिक आकर्षक दिसते.
G20 बैठकांच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या या कलाकृती असून, त्यावर त्याचा उल्लेख दिसतो.
टाकाऊ पदार्थांपासून साकारण्यात आलेला मासा या चौकाची शोभा अधिक खुलवत आहे.
सेंट अँथनीचे मिरामार येथील चॅपेल मिरामारच्या चौकाची शोभा वाढवत आहे.