दैनिक गोमन्तक
लहान मुलांच्या वाढीच्या काळात त्यांच्या शरिरावर आणि मनावर अनेक गोष्टींचा प्रभाव पडत असतो.
अनेक मुलांना अभ्यासात लक्ष केंद्रित करणे अवघड जाते.
मुलांसाठी दररोज व्यायाम करणे आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे खूप फायदेशीर आहे.
दररोज व्यायाम करणाऱ्या मुलांमध्ये तणावाचे प्रमाण कमी असते.
जी मुले धावतात, पोहतात किंवा कोणत्यातरी अॅक्टिव्हिटीमध्ये सामील होतात त्यांची एकाग्रतेची क्षमता वाढलेली दिसते.
मुलांच्या तणावाचे व्यवस्थापन आपल्या मुलांशी संवाद साधून, त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे जाणून घेऊन, त्यांना वेळीच गोष्टी समजावून देऊन, त्यांना वेळ देऊन केले जाऊ शकते.
योग्य संगोपनासाठी त्यांच्या शारिरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मुलांचे मैदानावर खेळणे महत्वाचे ठरते.