Manish Jadhav
फळे खाणे आरोग्यासाठी वरदान मानले जाते. डॉक्टर, आहारतज्ञ अनेकदा फळे खाण्याचा सल्ला देतात.
आज आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून अशा एका फळाबद्दल जाणून घेणार आहोत जे मधुमेह रुग्णांसाठी वरदान ठरते. हे फळ आहे रामफळ...
रामफळ हे दिसायला टोमॅटोसारखे आहे पण त्याची चव आणि गुणधर्म पूर्णपणे भिन्न आहेत. रामफळ तुम्ही कच्चे, कोरडे, पिकलेले किंवा शिजवलेले खाऊ शकता.
रामपळात नैसर्गिक साखरेचे प्रमाण इतके असते की त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
रामफळात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे.
रामफळात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.