मुलांना शिस्त लावायचीय? आधी पालकांनी बदलायला हव्यात 'या' सवयी; मुलं होतील अतिशय समजूतदार

Sameer Amunekar

संवाद साधा

मुलांवर सतत ओरडल्याने त्यांच्या मनात भीती किंवा राग निर्माण होतो. त्याऐवजी शांतपणे संवाद साधून त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून द्या. पालकांनी शांत राहिल्यास मुले अधिक चांगल्या प्रकारे ऐकतात.

Parenting habits for disciplined children | Dainik Gomantak

आदर्श

मुले पालकांचे शब्द ऐकण्यापेक्षा त्यांच्या कृतींचे अनुकरण जास्त करतात. जर तुम्हाला मुलांनी मोबाईल कमी वापरावा असे वाटत असेल, तर आधी तुम्हाला स्वतःचा स्क्रीन टाइम कमी करावा लागेल.

Parenting habits for disciplined children | Dainik Gomantak

संयम

मुले चुका करणारच, पण त्या वेळी आपला संयम न गमावणे ही पालकांची मोठी कसोटी असते. तुमचा शांत स्वभाव मुलांना संकटाच्या वेळी कसे वागायचे हे शिकवतो.

Parenting habits for disciplined children | Dainik Gomantak

प्रोत्साहन

मुलांच्या फक्त चुका काढण्यापेक्षा, त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करा. 'तू हे छान केलंस' असे म्हटल्याने मुलांना अधिक चांगले वागण्याची प्रेरणा मिळते.

Parenting habits for disciplined children | Dainik Gomantak

भावनांचा आदर

मुले जेव्हा हट्टीपणा करतात, तेव्हा त्यामागे काहीतरी कारण असते. त्यांच्या भावना समजून घ्या आणि त्यांना व्यक्त होऊ द्या. मुलांच्या मताचा आदर केल्यास ती अधिक समजूतदार होतात.

Parenting habits for disciplined children | Dainik Gomantak

स्पष्टता आणि सुसंगतता

घरातील नियम आज एक आणि उद्या दुसरे असे नसावेत. नियमांमध्ये स्पष्टता असेल, तर मुलांना काय योग्य आणि काय अयोग्य याची नीट समज येते.

Parenting habits for disciplined children | Dainik Gomantak

एकत्र वेळ घालवा

मुलांना महागड्या खेळण्यांपेक्षा पालकांचा वेळ हवा असतो. त्यांच्यासोबत खेळणे, गप्पा मारणे यामुळे तुमचे नाते घट्ट होते आणि मुले तुमच्या शब्दाचा मान राखू लागतात.

Parenting habits for disciplined children | Dainik Gomantak

कोकणच्या 'या' किनाऱ्यावर तुम्हाला होईल परदेशात असल्याचा भास

Konkan Tourism | Dainik Gomantak
येथे क्लिक करा