Kavya Powar
बदलत्या ऋतूमुळे अनेकदा पोटाच्या समस्यांमुळे त्रास होत असेल तर पपई खाणे फायदेशीर ठरू शकते.
फायबर असलेल्या या फळामध्ये इतरही अनेक पोषक घटक आढळतात. यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.
आजकाल खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयविकाराचा धोका वाढला आहे. यापासून हृदयाचे रक्षण करायचे असेल तर पपई खावी.
हा अँटी-ऑक्सिडंटचा खजिना आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि व्हिटॅमिन ई देखील मुबलक प्रमाणात आढळतात. त्यातील अनेक पोषक तत्वांमुळे याच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
पिकलेली पपई पचनासाठी खूप फायदेशीर असते. या फायबर समृद्ध फळामध्ये पॅपेन आणि सायमोपेन ही दोन एन्झाइम्स आढळतात.
त्यामुळे ते पचन सुधारतात आणि जळजळ कमी करतात.
सांधेसंबंधी समस्या आणि सांधेदुखीवरही पपई प्रभावी ठरू शकते. त्याचे पॅपेन आणि सायमोपेन एन्झाईम्स सूज कमी करण्याचे काम करतात.