Akshata Chhatre
चमकदार चेहरा प्रत्येकालाच हवा असतो. यासाठी बाजारातील महागड्या क्रिम्सपेक्षा घरच्या घरी बनवलेले फेस पॅक अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरतात.
याच घरगुती उपायांपैकी एक घरगुती उपाय म्हणजे पनीर आणि त्याचे पाणी वापरून तयार केलेला फेस पॅक.
पनीरमध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग घटक असतात. त्यामुळे कोरडी आणि निर्जीव झालेली त्वचा मऊसर आणि ताजीतवानी होते.
पनीर फेस पॅकमुळे त्वचेतील डाग, काळे ठिपके आणि रंगभेद कमी होतो. यामुळे चेहऱ्याचा नैसर्गिक तेज वाढतो.
पनीर आणि त्याच्या पाण्यात असणारे पोषणद्रव्य त्वचेच्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यात मदत करतात.
पनीरचं पाणी त्वचेला स्वच्छ करतं आणि मुरुमांचे प्रमाण कमी करण्यास सहाय्यक ठरू शकतं.
पावसाळ्याच्या दिवसांत त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं आणि पनीर फेस पॅक हा त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.