Pranali Kodre
भारतात 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने नवी जर्सी लाँच केली आहे.
लाहोरला नव्या जर्सी लाँचचा कार्यक्रम पार पडला.
या नव्या जर्सीचे फोटो पाकिस्तान क्रिकेट आणि आयसीसीने शेअर केले आहेत.
सोशल मीडियावरही हिरव्या रंग छटा असलेल्या पाकिस्तानच्या नवीन जर्सीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
पाकिस्तानच्या नव्या जर्सीवर उजव्या खांद्याच्या खाली वर्ल्डकपचा लोगो आणि भारताचे नाव दिसत आहे.
भारत वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा मुख्य आयोजक आहे. त्याचमुळे भारताचे नाव पाकिस्तानच नाही, तर हा वर्ल्डकप खेळणाऱ्या प्रत्येक संघाच्या जर्सीवर असणार आहे.
क्रिकेटमधील नियमानुसार आयसीसी आणि आशियाई स्पर्धांमध्ये खेळाडूंच्या जर्सीच्या समोरच्या बाजूच्या खांद्याच्या खाली उजव्या बाजूला स्पर्धेचा लोगो आणि आयोजकांचे नाव लिहिलेले असते.
याबरोबरच आयसीसी आणि आशियाई स्पर्धांमध्ये जर्सीवर पुढच्या बाजूला स्पॉन्सर्सचे नाव लिहिता येत नाही. जर्सीवर आपापल्या देशाचे नाव पुढे मोठ्या अक्षरात लिहिलेले असते.