Akshata Chhatre
आपल्या देशात सणासुदीचा हंगाम म्हणजे उत्साह, आनंद आणि भरभरून खरेदीचा काळ असतो. सणांमध्ये घरांची सजावट, नवे कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, सोने-चांदी, भेटवस्तू यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो.
हा काळ जरी आनंददायी असला, तरी अति खर्च आणि कर्जाचा मोह दीर्घकालीन आर्थिक स्थैर्याला धक्का देऊ शकतो.
आपल्याकडे ऋण काढून सण करू नये असे पूर्वापार सांगितले जात आहे, तरीही आजकाल आकर्षक योजनांच्या मोहजालात अडकून कर्जाच्या विळख्यात स्वतःहून अडकवून घेतले जाते.
बँका शून्य टक्के व्याज, प्रक्रिया शुल्क माफ, कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट देतात. मित्र, नातेवाइकांप्रमाणे महागड्या खरेदीची इच्छा. सेल, डिस्काउंट आणि मर्यादित कालावधीच्या ऑफर्स.
हप्त्याचे ओझे : मासिक खर्चात वाढ. व्याजाचा भार : शून्य टक्के ईएमआयच्या नावाखाली लपलेले चार्जेस, प्रोसेसिंग फी. बचत कमी होणे : बचतीसाठी ठेवलेली रक्कम हप्ते भरण्यासाठी वापरणे. क्रेडिट स्कोअरवर परिणाम : वेळेवर ‘ईएमआय’ न भरल्यास क्रेडिट स्कोअर घटतो.
सणासुदीसाठी वर्षभर थोडी-थोडी बचत वेगळी ठेवा. त्यामुळे शेवटच्या क्षणी कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. ‘इच्छा’ आणि ‘गरज’ वेगळी करा, घरातील आवश्यक वस्तू, आरोग्य, दुरुस्तीचे काम ही तुमची गरज आहे तर लक्झरी खरेदी, ब्रँडेड फॅशन ही आवड, कायम तुमच्या ‘गरजांना’ प्राधान्य द्या
सणासुदीसाठी वर्षभर थोडी-थोडी बचत वेगळी ठेवा. त्यामुळे शेवटच्या क्षणी कर्ज घेण्याची गरज पडणार नाही.