Akshay Nirmale
रॉबर्ट जे ओपनहायमर यांच्या नेतृत्वाखाली अणुबॉमब बनवला गेला. जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यानंतर जी हानी झाली ती पाहून ओपनहायमर यांनी माझ्या हातांना रक्त लागले, असे म्हटले होते.
जेफ्री हिंटन यांना फादर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटले जाते. एआय मुळे होत असलेले नुकसान पाहून त्यांनी स्वतःच्या या शोधावर दुःख व्यक्त केले होते.
मिखाईल क्लाशनिकोव्ह यांनी एके-47 रायफल ही सर्वाधिक खतरनाक रायफल बनवली होती. नंतर त्यांनी या रायफलऐवजी शेतकऱ्यांसाठी एखादे उपकरण बनवायला हवे होते, असे मत व्यक्त केले होते.
स्कॉट फाहलमन यांनी इमोजी आणि स्टिकर्सचा शोध लावला. ते म्हणाले होते की, याचा वापर चुकीच्या ठिकाणीही होतो. त्यामुळे असं वाटतंय की मी एखादा सैनातच बनवला आहे.
थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या सुप्रसिद्ध E = mc2 या समीकरणावरूनच अणुबॉम्बचा शोध लावला गेला. अणुबॉम्बमुळे झालेली हानी पाहून त्यांना पश्चात्ताप वाटला होता.
फिलिओ फार्न्सवॉर्थ यांनी टीव्हीचा शोध शिकवणाऱ्या उपकरणाच्या स्वरूपात लावला होता. पण नंतर त्यांनी टीव्हीमुळे लोक वेळ वाया घालवत आहेत, असे म्हटले होते.
आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाईटचा शोध लावला. नंतर त्यांना त्याचा पश्चात्ताम झाला आणि त्यांनी सर्व धनदौलत देऊन नोबेल पुरस्कार सुरू केला.