Pranali Kodre
चीनमधील होंगझाऊ येथे 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा खेळवली जात आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 23 सप्टेंबर 2023 रोजी थाटात पार पडला.
उद्घाटन सोहळ्यासह 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेला अधिकृतरित्या सुरुवात झाली.
या सोहळ्याला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत चीनचा इतिहास आणि त्याची उपलब्धी दाखवण्यात आली.
नेत्रदीपक लेझर शोने यावेळी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
उद्घाटन सोहळ्यासाठी भारताच्या पथकाचे ध्वजधारक भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि बॉक्सर लवलिना बोर्गोहेन होते.
यंदा भारताने तब्बल 655 खेळाडूंचे पथक आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठवले आहे.
भारतीय खेळाडू 61 क्रीडा प्रकारांपैकी 41 क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेतील खेळ विविध 56 ठिकाणी खेळले जाणार असून 481 सुवर्णपदकासाठी खेळ होणार आहेत.