Akshata Chhatre
आजच्या धकाधकीच्या आणि रासायनिक उत्पादनांनी भरलेल्या जीवनशैलीमध्ये केस गळणे, वाढ थांबणे, कोंडा होणे, केस फिकट आणि निष्प्रभ होणे अशा समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
महिलांपासून ते तरुणांपर्यंत, प्रत्येकजण केसांच्या आरोग्याबाबत चिंतेत आहे.
महागड्या शांपू, सिरम्स, स्पा ट्रीटमेंट्स यांचा परिणाम काही काळापुरताच टिकतो. पण यामुळे केसांच्या मूळ समस्यांवर उपाय होत नाही.
याच पार्श्वभूमीवर, एक पारंपरिक आणि नैसर्गिक उपाय पुन्हा चर्चेत आला आहे तो म्हणजे कांद्याचा रस.
कांद्याचा रस केवळ स्वस्तच नव्हे, तर प्रभावीही आहे. कांद्यात असणारं नैसर्गिक सल्फर टाळूतील रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करतं.
अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे टाळूवर होणारी खाज, सुकं, कोंडा, बुरशी यांवर नियंत्रण मिळतं.
ताज्या कांद्याचा रस काढून, आठवड्यातून एकदा टाळूवर लावा. अर्धा ते एक तास ठेवा आणि सौम्य शांपूने केस धुवा.