Akshay Nirmale
एखाद्या परकीय देशात जाण्यासाठी त्या देशाचा व्हिसा असावा लागतो. युरोपमध्ये मात्र शेंजेन (schengen) व्हिसा नावाची एक सुविधा आहे. ज्याद्वारे या एकाच व्हिसामुळे युरोपमधील 26 देशांमध्ये जाता येते.
शेंजेन एरियामध्ये युरोपमधील 27 देशांचा समावेश आहे. शेंजेन व्हिसा असेल तर यातील 26 देशांचा स्वतंत्र व्हिसा काढण्याची गरज राहत नाही
भारतातून सर्वाधिक पर्यटक हे युरोपला जात असतात. शेंजेन व्हिसामुळे युरोपमधील 26 देशांमध्ये प्रवेश मिळतो.
युरोपला जाणारे शेंजेन व्हिसासाठी अर्ज करू शकतात. पण हा व्हिसा सहजासहजी मिळत नाही. सन 2022 मध्ये 1 लाखाहून अधिक भारतीयांचे अर्ज फेटाळले गेले होते.
नेदरलँड्स, स्लोव्हेनिया, स्वित्झर्लंड, हंगेरी, फ्रान्स, जर्मनी, झेक रिपब्लिक, ऑस्ट्रिया, इटली, ग्रीस, लिथुआनिया, पोर्तुगाल, स्पेन या देशात या व्हिसामुळे प्रवेश मिळतो.
तसेच स्पेन, लॅटव्हिया, स्वीडन, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलँड, आईसलँड, लक्झेमबर्ग, माल्टा, नॉर्वे, पोलंड, बेल्जियम आणि स्लोव्हाकिया या देशांमध्ये या व्हिसामुळे प्रवेश मिळतो.
शेंगेन व्हिसा पर्यटकांसाठी आणि अल्प-मुदतीच्या प्रवाशांसाठी आहे. या व्हिसाचा कालावधी 90 दिवसांचा असतो.