Akshata Chhatre
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढतं प्रदूषण, ताणतणाव, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बदलता दिनक्रम यामुळे केसगळती ही अनेकांची मोठी समस्या बनली आहे.
पावसाळ्यात तर ही अडचण अधिकच वाढते आणि टक्कल पडण्याचा धोका निर्माण होतो.
केसगळतीमुळे आत्मविश्वासावर परिणाम होतो, त्यामुळे लोक अनेक उपाय करतात. पण चुकीच्या सवयींमुळे केसांची हानी आणखी वाढते.
केस निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या पण महत्त्वाच्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, केसांना तेल लावणं फायदेशीर असलं तरी रात्रभर तेल ठेवणं टाळावं.
योग्य वेळ म्हणजे केस धुण्याच्या ४५ मिनिटांपूर्वी तेल लावणं, ज्यामुळे पोषण थेट केसांपर्यंत पोहोचतं.
अनेकजण रोज शाम्पू करून केस स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण रोज शाम्पू केल्याने टाळूतील नैसर्गिक तेल कमी होतं, केस कोरडे पडतात आणि तुटतात.
आठवड्यातून २-३ वेळा सौम्य (जेंटल) आणि सल्फेट-फ्री शाम्पू वापरणं फायदेशीर ठरतं.