Pranali Kodre
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोमवारी, 24 एप्रिल 2023 रोजी त्याचा 50 वा वाढदिवस साजरा केला.
त्याच्या या वाढदिवसानिमित्त आणि त्याच्या शारजातील वादळी खेळीच्या 25 वर्षपूर्ती निमित्त मोठा सन्मान करण्यात आला आहे.
युएईतील शारजा क्रिकेट स्टेडियममधील एका स्टँटला सचिनचे नाव देण्यात आले आहे.
त्यामुळे आता शारजा स्टेडियममधील वेस्ट स्टँड आता 'सचिन तेंडुलकर स्टँड म्हणून ओळखले जाईल.
या स्टँडला सचिनचे नाव देण्यासाठी खास सोहळाही ठेवण्यात आला होता.
सचिनने याच स्टेडियमवर 1998 मध्ये 22 एप्रिलला 143 धावांची आणि 24 एप्रिल रोजी 134 धावांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी केल्या होत्या.
त्यावेळी मैदानात वाळूचं वादळ आल्यानंतर सचिनने ही खेळी केली असल्याने त्यांना वादळी खेळी (Desert Storm) म्हणूनही ओळख मिळाली.
महत्त्वाचे म्हणजे केवळ शारजा स्टेडियममध्येच नाही, तर सिडनी क्रिकेट ग्राऊंडमधील गेटलाही सोमवारी सचिन आणि ब्रायन लारा यांचे नाव देण्यात आले.