Team India ने 10 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात जिंकलेली अखेरची ICC ट्रॉफी

Pranali Kodre

भारताचे विजेतेपद

भारतीय क्रिकेट संघाने बरोबर 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 23 जून 2013 रोजी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते.

ICC Champions Trophy 2013 | Twitter

अखेरचे ICC विजेतेपद

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे हे चौथे आयसीसी विजेतेपद ठरले होते. तसेच यानंतर अद्याप भारतीय संघाला आयसीसी विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही.

ICC Champions Trophy 2013 | Twitter

धोनीचा विश्वविक्रम

या विजेतेपदाबरोबरच धोनी जगातील असा पहिलाच कर्णधार ठरला होता, ज्याने टी20 वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी हे आयसीसीचे तीन विजेतेपदे मिळवली.

MS Dhoni | Twitter

इंग्लंडचा पराभव

चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 स्पर्धेच्या बर्मिंगघमला झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला 5 धावांनी पराभूत केले होते. 50-50 षटकांचा हा सामना पावसामुळे 20-20 षटकांचा करण्यात आलेला.

ICC Champions Trophy 2013 | Twitter

भारताची प्रथम फलंदाजी

अंतिम सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात केवळ 7 विकेट्स गमावत 129 धावा करता आल्या होत्या.

ICC Champions Trophy 2013 | Twitter

विराटच्या सर्वाधिक धावा

भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 43 धावा केल्या होत्या. तसेच जडेजाने नाबाद 33 आणि शिखर धवनने 31 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून रवी बोपाराने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या.

ICC Champions Trophy 2013 | Twitter

भारताची गोलंदाजी

भारताकडून 130 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना भारताकडून जडेजा, आर अश्विन, इशांत शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच उमेश यादवने 1 विकेट मिळवली होती.

ICC Champions Trophy 2013 | Twitter

भारताचा विजय

त्यामुळे इंग्लंडच्या संघाला 20 षटकात 8 बाद 124 धावाच करता आल्या आणि भारताने 5 धावांनी विजय मिळवला.

ICC Champions Trophy 2013 | Twitter

सामनावीर

जडेजाने केलेल्या अष्टपैलू खेळामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.

ICC Champions Trophy 2013 | Twitter
Pat Cummins and Nathan Lyon | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी