Pramod Yadav
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी “विकसीत भारत 2047 आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींची भूमिका” या विषयावर त्यांचे विचार व्यक्त केले.
संसद असो किंवा विधानसभा असो हा सरकारपर्यंत पोहचण्याचा एक मार्ग आहे. पण, अलिकडे विरोध करण्याचा नवा मार्ग निर्माण झाला आहे.
विधानसभेत होणाऱ्या चर्चा कमी होत चालल्या आहेत हा चिंतेचा विषय आहे. मात्र, गोव्यात 40 दिवसांपासून अधिककाळ कामकाज चालते ही दिलासादायक बाब आहे.
विधानसभेत सर्वच विषयांवर, लोकांच्या समस्यांवर चर्चा व्हायला पाहिजे. गोवा विधानसभेकडून माझ्या अधिक अपेक्षा आहेत.
सामुहिक प्रयत्नाच्या जोरावर देशाच्या विविधतेतील एकता आपण जगाला दाखवून दिली. 75 वर्षात देशाची लोकशाही अधिक मजबूत झाली आहे.
1947 नंतर देखील गोव्याने स्वातंत्र्यासाठी मोठी लढाई लढली. शिक्षण, आरोग्य यासारख्या क्षेत्रात गोवा पुढे जात आहे ही चांगली बाब आहे.'
गोवा देशातच नव्हे तर जगातील एक प्रसिद्ध पर्यटन ठिकाण म्हणून उदयास आले आहे. असे ओम बिर्ला म्हणाले.