Akshata Chhatre
कामावर जाताना उत्साह वाटत नसेल, सतत थकवा आणि मानसिक दडपण जाणवत असेल, तर वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
ऑफिसमधील ताणामुळे फक्त कामावरच नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यावरही नकारात्मक परिणाम होतो.
दिवसाची सुरुवात डायरीत कामांची यादी लिहून करा. कमी वेळ लागणारी सोपी कामे आधी लिहा आणि जास्त वेळ लागणारी कठीण कामे शेवटी लिहा.
कितीही काम असले तरी, एका जागी बसून तासन्तास काम करू नका. दर २५-३० मिनिटांनंतर ५ मिनिटांचा ब्रेक घ्या.
तुम्ही तुमच्या ऑफिसमधील प्रत्येक काम, बैठक किंवा अतिरिक्त जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे असे नाही. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा नम्रपणे 'नाही' म्हणा.
कामात कितीही व्यस्त असलात तरी दररोज १५-३० मिनिटे चालायला जा, योगा करा किंवा कोणताही हलका व्यायाम करा.
ऑफिसचे काम आणि वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवा. घरी आल्यावर ऑफिसचे काम शक्यतो करू नका. घरी घालवलेला वेळ कुटुंबाला आणि स्वतःला द्या.