Akshata Chhatre
आजकाल ऑफिसमधील सहकाऱ्यांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होणे खूप सामान्य झाले आहे.
कामाच्या निमित्ताने तासनतास एकत्र असल्यामुळे काही सहकाऱ्यांमध्ये भावनिक जवळीक निर्माण होते आणि हळूहळू त्याचे रूपांतर प्रेमात होते.
अशा ऑफिस अफेअरचे नेमके धोके काय आहेत, ते जाणून घेऊया.
तुमच्या नात्याबद्दल ऑफिसमध्ये चर्चा सुरू झाली तर तुमची व्यावसायिक प्रतिमा खराब होऊ शकते.
जर नातेसंबंध संपले, तर त्याच व्यक्तीसोबत रोज काम करणे मानसिकदृष्ट्या खूप थकवणारे ठरू शकते. यामुळे कामाच्या वातावरणावर नकारात्मक परिणाम होतो.
जर तुमच्या जोडीदाराला पदोन्नती मिळाली किंवा त्याला कोणतीही विशेष जबाबदारी दिली गेली, तर इतर सहकारी त्याला पक्षपात मानू शकतात.
कामाच्या ठिकाणी एकमेकांबद्दल व्यावसायिक दृष्टिकोन ठेवा. जास्त वैयक्तिक बोलणे किंवा प्रेम व्यक्त करणे टाळा.