Sameer Panditrao
मार्च ७ ते ९ दरम्यान साखळी येथील रवींद्र भवनमध्ये ‘ऑक्टेव्ह-२०२५’ महोत्सव पार पडला.
बिहू नृत्यातील तालबद्ध चपळता, मणिपूर नृत्यातील लाघवी डौल, नागा युद्ध नृत्यातील उत्साही ऊर्जा – या साऱ्या नृत्यशैलींनी महोत्सवाची रंगत वाढवली.
उत्तर-पूर्व प्रदेशातील आर्त लोकसंगीत, पारंपरिक गीते, तसेच पाश्चात्य बँडवरील थिरकती गाणी यामुळे संगीतप्रेमींना अपूर्व आनंद मिळाला.
नयनरम्य पोशाख आणि उत्तर-पूर्वेकडील पारंपरिक वेशभूषेचा भव्य फॅशन शो हा महोत्सवातील आकर्षणाचा मुख्य भाग ठरला.
या महोत्सवात उत्तर-पूर्वेकडील खाद्य पदार्थांची रेलचेल होती. स्थानिक आणि पर्यटकांनी विविध स्वादांचा आनंद घेतला.
हस्तकला प्रदर्शनातून उत्तर-पूर्वेकडील कलाकृतींची झलक पाहायला मिळाली. लोककथा, आख्यायिका आणि कलाविष्कार यामुळे महोत्सव अधिकच संपन्न झाला.
गोव्यात राहणाऱ्या उत्तर-पूर्वीय नागरिकांसाठी हा महोत्सव त्यांच्या घरापासून दूर त्यांच्या संस्कृतीशी जोडणारा एक अनमोल अनुभव ठरला.