गोमन्तक डिजिटल टीम
पावसाळ्यात माश्यांचा मोठा त्रास होत असल्याचे अनेकदा दिसून येते.
या माश्यांपासून सुटका करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज असते.
घर आणि घराबाहेर स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात शक्यतो घराच्या खिडक्या आणि दरवाजा बंद ठेवा. बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ धुवा. किंवा खिडक्यांना जाळी, मच्छरदाणी लावा.
घरात कीटकांचा वावर कमी करण्यासाठी इंसेक्ट रेपेलंट स्प्रे मारा. मात्र त्याचा वापर करताना घरातील लहान मुलं तसेच खाण्याचे पदार्थ दूर ठेवा.
संध्याकाळी धूपासोबत कापूर जाळल्यास माश्या कमी होतात. घरात चारही कोपर्यात कापराच्या गोळ्या टाका. माश्या खूप असतील तर कापूर जाळा.
तुळशीमधील औषधी गुणधर्मासोबत कीटकांना दूर ठेवण्याची क्षमतादेखील आहे.