Akshay Nirmale
नुकतेच गोवा सरकारने नवीन शॅक धोरण जाहीर केले आहे. त्यात शॅक्समध्ये स्थानिक गोवन खाद्यपदार्थ ठेवणे बंधनकारक केले आहे.
शॅक्समध्ये केवळ चायनीज खाद्यपदार्थ, फास्टफूड मिळते, स्थानिक खाद्यपदार्थ मिळत नसल्याच्या तक्रारी पर्यटकांकडून होत होत्या.
या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने प्रत्येक शॅकमधअये गोव्यातील स्थानिक खाद्यपदार्थ, स्थानिक जेवण ठेवणे बंधनकारक केले आहे.
याशिवाय पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी शॅकमालक, किनारी भागातील आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींची बैठक घेत तक्रारींचे निरसन केले.
गोव्यात समुद्रकिनाऱ्यांवर एकूण 359 शॅक्स आहेत. एकूण शॅक्सपैकी दोन तृतीयांश शॅक्स उत्तर गोव्यात आहेत.
गोव्यातील 90 टक्के शॅक्स पारंपरिक ऑपरेटर्सना चालवायला दिल्या जातात. तर 10 टक्के नवोदितांसाठी राखीव असतात.
समुद्रकिनाऱ्यावर पर्यावरणपूरक साहित्य वापरून शॅक्स उभाररल्या जातात. परदेशी पर्यटक समुद्रकिनारी आराम करण्यासाठी, पहुडण्यासाठी शॅक्समध्ये येतात.