Akshata Chhatre
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे केस गळणे, वाढ थांबणे आणि वेळेआधी पांढरे होणे या समस्या अगदी सर्वसामान्य झाल्या आहेत.
अनेक महिला महागडे शॅम्पू आणि कंडिशनर वापरतात, पण त्यातील रसायने केसांच्या नैसर्गिक मुळांवर परिणाम करून अधिक नुकसान करतात.
यावर उत्तम उपाय म्हणजे नैसर्गिक आणि घरगुती घटक वापरणे. आयुर्वेद या पारंपरिक पद्धतीत जास्वंद, कडिपत्ता आणि खोबरेल तेलाचे मिश्रण केसांसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते.
केसांच्या सर्व समस्यांवर जास्वंद हा एक जुना आणि विश्वासार्ह उपाय आहे. जास्वंदाची पाने आणि फुलं दोन्हीही केसांच्या मुळांना पोषण देतात.
खोबरेल तेल: केवळ स्वयंपाकासाठीच नाही, तर केसांसाठीही वरदान आहे. यात असलेले बीटा-कॅरोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्या कमी होते.
खोबरेल तेल केसांसाठी सर्वात उत्तम मानले जाते. यात असलेले लॉरिक अॅसिड केसांच्या मुळांमध्ये खोलवर शोषले जाते, ज्यामुळे केसांना आतून मजबुती मिळते.
खोबरेल तेलाने मसाज केल्याने केसांचे तुटणे थांबते आणि कोरडेपणा कमी होतो. हे तेल इतर घटकांचे गुणधर्म केसांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे करते.