गोमन्तक डिजिटल टीम
चित्रपट करण्यासोबतच सुनील शेट्टी बऱ्याच व्यवसायांमध्ये गुंतलेला आहे, हेच त्याचं चित्रपट क्षेत्रात कमी दिसण्याचं सुद्धा एक कारण आहे.
बांधकाम, हॉटेल-रेस्टॉरंट, क्लब-पब आणि चित्रपट प्रोडक्शन हाऊस यासारख्या असंख्य बिझनेस मध्ये त्याने आपला पैसा गुंतवला आहे.
सुनील शेट्टी मूळ कर्नाटकचा आणि त्याच शिक्षण हे हॉटेल मॅनेजमेंटचं. कर्नाटकी म्हटल्यावर हॉटेल नाही असं होणार तर नाही. वडिलांचं उडीपी रेस्टॉरंट.
मिशचीफ रेस्टॉरंट आणि एचटूओ हा क्लब. हे सुनील शेट्टीच्या मालकीचे मुंबई बेस बिझनेस.
2010 ला मिशचीफ रेस्टॉरंट बंद करून आपली स्वतःची इटालियन हॉटेल चेन त्याने सुरू केली. नवी मुंबईतील, बेलापूर मधला बार पण नाईट लाईफ जगणाऱ्यांमध्ये बराच प्रसिद्ध आहे.
रिसेशनच्या काळात 2012 साली सुनील शेट्टीने स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन केली. एस टू रिऍलिटी.
यासह अनेक विविध बिझनेसमध्ये त्यांने पैसा गुंतवला आहे. या सर्व मार्गाने मिळणारं त्याच वार्षिक उत्पन्न हे 100 करोडच्या घरात आहे. यात त्याची चित्रपटांची फी वेगळी आहे.