गोमंतक ऑनलाईन टीम
आपले व्हॉट्सअॅप चॅटिंग इतर कुणी वाचू शकते का याची भीती अनेकदा वाटत असते.
पुर्वी केवळ व्हॉट्सअॅप वेब हा ऑप्शन होता.
पण आता व्हॉट्सअॅपने युजर्सना मल्टी डिव्हाईस सपोर्ट दिला आहे.
त्यामुळे एकाहून अधिक डिव्हाईसवर व्हॉट्सअॅप वापरता येणे शक्य आहे.
तुम्हाला जर तुमचे व्हॉट्सअॅप मेसेजेस आधीच वाचले जात आहेत, असे वाटत असेल तर लिंक्ड डिव्हाईस या ऑप्शनमध्ये जावे.
लिंक्ड डिव्हाईस या ऑप्शनमध्ये तुम्ही किती ठिकाणी अॅक्टिव्ह आहात ते दिसते. तुम्हाला गरज वाटल्यास लिंक्ड डिव्हाईसेस रिमुव्हही करता येईल.
कंपनीने सध्या कॅम्पॅनियन मोड दिला आहे. तो सध्या व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये आहे. याद्वारे एकच व्हॉट्सअॅप दोन फोनमध्ये वापरता येऊ शकते.