Akshay Nirmale
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक खातेदारांना केवायसी (नो युअर कस्टमर) अपडेट करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे बँकादेखील सतत फोन, मेसेजस, मेलद्वारे ग्राहकांना केवायसीसाठी आग्रही राहत असतात.
तथापि, अनेक बँक खातेदार बँकेत जाण्याचा कंटाळा करत असतात. त्यामुळे केवायसी अपडेट करायचे राहून जाते. पण, केवायसी अपडेट ऑनलाईन देखील करता येईल.
KYC ऑनलाईन अपडेट करण्यासाठी बँकेच्या वेबसाईटवर, ऑनलाईन पोर्टलवर लॉगिन करा. तिथे केवायसी शोधा आणि त्यावर क्लिक करा.
स्क्रीनवर दिसणाऱ्या निर्देशांचे पालन करा. स्वतःचे नाव, पत्ता, जन्म तारखेसह सर्व माहिती भरा.
त्यानंतर आधार, पॅन आणि इतर आवश्यक दस्तऐवजांच्या स्कॅन कॉपीज अपलोड करा.
त्यानंतर सबमिट बटणवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर मिळेल.
बँकेच्या एसएमसएसमधून तुम्हाला केवायसी अपडेट झाले आहे की नाही ते कळेल.