Ashutosh Masgaunde
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
एक तोळे सोन्याची किंमत 60 हजार रुपयांच्या खाली आली आहे. बाजारात चांदीच्या प्रति एक किलोचे भाव 71 हजारांच्या आसपास आहेत.
दहा दिवांपूर्वी म्हणजेत 11 जूनला एक तोळे सोन्याचा भाव 60,003 रुपये इतका होता.
यानंतर सोन्याचे भाव सातत्याने घसरत असल्याचे दिसत आहे. गेल्या दहा दिवसांत एक तोळे सोन्याच्या भावाने 59002 रु. ही निच्चांकी पातळी गाठली होती.
गेल्यास महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्याा भावाने 61800 रु. ही उच्चांकी पातळी गाठली होती.त
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्याच्या दिवसांत सोन्याच्या किंमती कायम उतरत असल्याचा इतिहास आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये इथून पुढेही सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण होत राहिल असे तज्ज्ञ म्हणतात.