Night Skincare Routine: त्वचा सुंदर अन् तजेलदार हवीये? मग रात्री झोपण्यापूर्वी 'या' 7 चुका अजिबात करु नका; नाहीतर...

Manish Jadhav

मेकअप न काढता झोपणे

रात्री मेकअप न काढल्यास त्वचेची छिद्रे (Pores) बुजतात आणि पिंपल्सची समस्या वाढते. त्यामुळे झोपण्यापूर्वी क्लिन्झरने चेहरा स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे.

Night skincare routine for glowing skin | Dainik Gomantak

गरम पाण्याने चेहरा धुणे

रात्री अति-गरम पाण्याने तोंड धुतल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी पडते. नेहमी कोमट किंवा साध्या पाण्याचाच वापर करावा.

Night skincare routine for glowing skin | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर न लावणे

रात्री त्वचा स्वतःची दुरुस्ती (Repair) करत असते, त्यामुळे मॉइश्चरायझर न लावल्यास त्वचा निस्तेज दिसते. त्वचेच्या प्रकारानुसार योग्य रात्रीचे क्रीम नक्की वापरावे.

Night skincare routine for glowing skin | Dainik Gomantak

इन्फेक्शन

अस्वच्छ उशीवर साचलेले बॅक्टेरिया आणि धूळ चेहऱ्यावर लागून इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे आठवड्यातून किमान दोनदा उशीचे कव्हर बदलावे.

night skincare routine| glowing skin overnight | Dainik Gomantak

स्किनकेअर उत्पादनांचा अतिवापर

रात्री एकाच वेळी अनेक प्रकारची प्रॉडक्ट्स लावल्याने त्वचेवर जळजळ किंवा रिएक्शन होऊ शकते. नाईट रुटीन जितके साधे आणि मर्यादित ठेवता येईल तितके चांगले.

Night skincare routine for glowing skin | Dainik Gomantak

चेहरा जोरजोरात घासून पुसणे

धुतल्यानंतर चेहरा टॉवेलने जोरजोरात घासल्याने त्वचेवर बारीक सुरकुत्या आणि ताण येतो. टॉवेलने चेहरा नेहमी हलक्या हाताने टॅप करुन (Dab) पुसावा.

night skincare routine| glowing skin overnight | Dainik Gomantak

मोबाईल वापरत उशिरा झोपणे

झोपण्यापूर्वी मोबाईल पाहिल्याने स्क्रीनच्या ब्ल्यू लाईटमुळे त्वचेचा टोन बिघडतो आणि डार्क सर्कल्स वाढतात. तसेच अपुऱ्या झोपेमुळे चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो कमी होतो.

Korean Skincare Routine | Dainik Gomantak