Puja Bonkile
नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांनी स्वत:ला फिट कसे ठेऊ शकतात हे जाणून घेऊया.
अनेक महिला आणि पुरूष नाईट शिफ्टमध्ये काम करतात.
पण नाईट शिफ्टमध्ये काम करतांना स्वत:ला फिट ठेवणे देखील गरजेचे असते.
यासाठी सर्वात पहिले पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही नाईट शिफ्टला चांगले काम करू शकता.
शरीरात पाण्याची कमतरता जाणवू देऊ नका.
आहारात फळं आणि सुक्यामेव्यांचा समावेश करावा.
दिवसभरात एकदा तरी 30 मिनिटं व्यायाम करावा.