New Gen Kia Seltos: दमदार लूक आणि शानदार फीचर्ससह येतेय धमाकेदार 'किआ सेल्टोस'

Manish Jadhav

किआ सेल्टोसचा नवा अवतार

2019 मध्ये भारतात लाँच झाल्यापासून किआ सेल्टोस खूप लोकप्रिय आहे. आता कंपनी या एसयूव्हीची नवीन जनरेशन लवकरच बाजारात आणणार आहे.

New Gen Kia Seltos | Dainik Gomantak

आधुनिक डिझाइन

नवीन सेल्टोस सध्याच्या मॉडेलपेक्षा जवळपास 100 मिमी जास्त लांब असेल. यामुळे केबिन आणि बूट स्पेस वाढेल. समोर मोठी ग्रिल आणि आकर्षक हेडलॅम्प्स असतील.

New Gen Kia Seltos | Dainik Gomantak

डिजिटल सेटअप

नव्या सेल्टोसमध्ये जास्त डिजिटल सेटअप असेल. यात ड्रायव्हर डिस्प्ले, इन्फोटेनमेंट आणि पॅसेंजरसाठी असे तीन मोठे स्क्रीन्स असतील.

New Gen Kia Seltos | Dainik Gomantak

नवीन तंत्रज्ञान आणि फीचर्स

नव्या सेल्टोसमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, अॅम्बियंट लायटिंग आणि वायरलेस चार्जिंगसारखे फीचर्स कायम राहतील. याशिवाय, ADAS (Advanced Driver-Assistance Systems) तंत्रज्ञानही यात मिळू शकते.

New Gen Kia Seltos | Dainik Gomantak

प्रीमियम इन्फोटेनमेंट स्क्रीन

या शानदार कारमध्ये 12.3 इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन, 12.3 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 5 इंचाची क्लाइमेट कंट्रोल स्क्रीन असेल.

New Gen Kia Seltos | Dainik Gomantak

इंजिन आणि हायब्रिड पर्याय

किआ जुने पेट्रोल आणि डिझेल इंजिन कायम ठेवणार आहे. मात्र, नव्या मॉडेलमध्ये हायब्रिड इंजिनचा नवीन पर्याय मिळण्याची दाट शक्यता आहे.

New Gen Kia Seltos | Dainik Gomantak

जागतिक लॉन्चिग

नवीन जनरेशनच्या किआ सेल्टोसचे जागतिक लॉन्च 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, ही कार 2026 मध्ये भारतात लॉन्च होईल.

New Gen Kia Seltos | Dainik Gomantak

किआसाठी महत्त्वाचे अपडेट

भारतीय बाजारात किआसाठी सेल्टोस हे महत्त्वाचे मॉडेल आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनीसाठी हे अपडेट खूप गरजेचे आहे.

New Gen Kia Seltos | Dainik Gomantak

Sleeping Health: झोपताना मोबाईल शेजारी ठेवताय? 'हे' धोके तुमच्यासाठी ठरु शकतात जीवघेणे