Pranali Kodre
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट 22 जुलै रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.
सध्याच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक ट्रेंट बोल्टला समजले जाते. तो डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. त्याला त्याच्या आक्रमकतेसाठी, अचूक यॉर्करसाठी आणि वेगासाठी ओळखले जाते.
साल 2011 मध्ये बोल्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याची विशेषत: म्हणजे तो बऱ्याचदा सुरुवातीला विकेट्स मिळवून देतो.
बोल्टने न्यूझीलंडसाठी वनडेत दोनवेळा हॅट्रिकही घेतल्या आहेत. यातील एक हॅट्रिक त्याने २०१९ वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध घेतली होती. तसेच त्याने 2018 मध्ये अबुधाबीमध्ये पाकिस्तानविरुद्ध एक हॅट्रिक घेतली होती.
बोल्ट 2019-20 कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकलेल्या न्यूझीलंड संघाचाही महत्त्वाचा भाग होता.
बोल्टने त्याच्या कारकिर्दीत 78 कसोटी सामने खेळले असून यात त्याने 317 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच त्याने 99 वनडे आणि 55 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून वनडेत त्याने 187 विकेट्स घेतल्या आहेत, तर आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 74 विकेट्स घेतल्या आहेत.
बोल्टने 88 आयपीएल सामने खेळले असून 105 विकेट्स घेतल्या आहेत.