दैनिक गोमन्तक
पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया, गतवर्षाची गोळाबेरीज करूया, चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया.
पाकळी पाकळी भिजावी अलवार, त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे,असे जावो वर्ष नवे…
सुख दुःख सहन करत, मात दिली त्या गत वर्षा. मनामनातील भावनांनी, स्वागत करू या नववर्षा….
उधाण येवो सत्कार्याला, फूटो यशाची पालवी. पूर्ण होवो तुमच्या इच्छा, नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
स्वप्ने उरलेली.. या नव्या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू!
नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर. उंच उंच ध्येयाची शिखरे, गगनाला घालूया गवसणी, हाती येतील सुंदर तारे !
गेलं ते वर्ष, गेला तो काळ, नवीन आशा अपेक्षा, घेवून आले 2023 साल…
मना मनातून आज उजळले आनंदाचे लक्षदिवे…समृध्दीच्या या नजरांना घेऊन आले वर्ष नवे….
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाचं स्वागत करु...