'या' गोष्टी AI चॅटबॉटला कधीही सांगू नका, नाहीतर पस्तावाल...

Akshay Nirmale

आर्थिक माहिती

आर्थिक सल्ला, वित्त व्यवस्थापनासाठी काही लोक एआय चॅटबॉट्सची मदत घेतात. ते सायबर गुन्हेगारीला बळी पडू शकतात. त्यामुळे चॅटबॉटला कोणतीही आर्थिक माहिती देऊ नये.

AI ChatBot | Google Image

वैयक्तिक तपशील

काही लोक विविध कारणांसाठी वैयक्तिक तपशील चॅटबॉटला पुरवतात. निवासी माहिती, जन्मतारीख, अशा माहितीतून तुमची गोपनीयता धोक्यात येऊ शकते.

AI ChatBot | Google Image

आरोग्यविषयक माहिती

जर तुम्ही शारिरीक, मानसिक आरोग्यासाठी एआयचा वापर करत असाल तर ते तुम्हाला असे प्रिस्क्रिप्शन सुचवू शकते ज्यातून तुमचा फायदा होण्यापेक्षा तोटाच होऊ शकतो.

AI ChatBot | Google Image

कामाशी संबंधित गोष्टी

तुमच्या कामाशी संबंधित गोपनीय गोष्टी कधीही चॅटबॉटसोबत शेअर करू नका. अॅपल, सॅमसंग, जेपी मॉर्गन आणि गुगलने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी चॅटबॉट्सचा वापर करू नये, असा इशारा दिला आहे.

AI ChatBot | Google Image

गोपनीयतेला धोका

चॅटबॉट्स गोपनीयतेसाठी धोका बनू शकतात. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, सॅमसंगच्या एका कर्मचाऱ्याने कोडिंगसाठी चॅट जीपीटीचा वापर केल्याने कंपनीची गोपनीय माहिती उघड झाली होती.

AI ChatBot | Google Image

पासवर्ड शेअर करू नका

चॅटबॉटसोबत कोणताही पासवर्ड कधीही शेअर करू नका. हे चॅटबॉट्स तुमचा सर्व डेटा सार्वजनिक सर्व्हरवर अपलोड करतात, त्यातून हॅकर्स तुमचा पासवर्ड शोधून तुमची फसवणूक करू शकतात.

AI ChatBot | Google Image

इटलीत बंदी

मे 2022 मध्ये युरोपियन युनियन जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशनमुळे इटलीमध्ये चॅट GPT वर बंदी घालण्यात आली आहे.

AI ChatBot | Google Image
Ratan tata and Goa | Dainik Gomantak