Pranali Kodre
आशियाई क्रीडा स्पर्धेमधील पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेतील नेपाळ आणि मंगोलिया यांच्यातील आंतरराष्ट्रीय टी20 सामना विश्वविक्रमी ठरला.
या सामन्यात अनेक विक्रम रचले गेले, त्यातील एक विक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा.
या सामन्यात दिपेंद्र सिंग ऐरेने 10 चेंडूत 8 षटकारांसह नाबाद 52 धावा केल्या.
दिपेंद्र सिंगने केवळ 9 चेंडूतच 50 धावांचा टप्पा गाठला होता.
त्यामुळे आता तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू ठरला.
दिपेंद्र सिंगने तब्बल 16 वर्षांपूर्वीचा युवराज सिंगचा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम मोडला.
युवराजने 2007 टी20 वर्ल्डकपमध्ये 12 चेंडूत अर्धशतक केले होते. त्यावेळी त्याने एकाच षटकात 6 षटकार मारले होते.